Monday, June 23, 2025 05:23:05 AM

उद्धव ठाकरेंच्या घरातून काम करणाऱ्यावर बावनकुळेंची टीका

घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव यांना लगावला.

उद्धव ठाकरेंच्या घरातून काम करणाऱ्यावर बावनकुळेंची टीका

नागपूर : अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. याआधी सकाळी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. 


सम्बन्धित सामग्री