मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुक पार पडली आहे. आज त्यांची मतांची मोजणी होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. नाशिकमधील येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ आघाडीवर आहेत. 4500 मतांच्या आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीअखेर छगन भुजबळ आघाडीवर आहेत.
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून येवला मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. येवला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे उभे आहेत. येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ खूप वर्षापासून त्या मतदारसंघात कार्यरत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पाहायला मिळाले. शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम केलेले छगन भुजबळ पवारांसोबत न जाता अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ पुन्हा निवडून येणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.