मुंबई : 'बिहारी फ्रंट'तर्फे छठ पूजा २०२४ चे गुरुवार, ७ नोव्हेंबरला जुहू चौपाटी येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ही पूजा सुरू राहणार आहे. यंदा या पूजेचे २७ वे वर्ष आहे.उत्तर भारतीयांसाठी छठपूजा ही एक - पर्वणी असते. त्यात सहभागी होणाऱ्या छठ व्रतीयांसाठी सर्व सोयी-सुविधांची व्यवस्था जुहू चौपाटीवर करण्यात आली आहे. भोजपुरी आणि मैथिली भाषेतील भजन व कीर्तनाचे कार्यक्रमही यावेळी होणार आहेत. भोजपुरी गायक गोलू तिवारी, भोजपुरी गायिका दीपिका झा तसेच आणि गायिका श्रुती झा यांचे लोकगीत आणि भजन कार्यक्रम यावेळी सादर होणार आहेत.