छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. कोंडीतून वाहने बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. गणेशोत्सवामध्ये शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढावे,अशी शांतता समितीच्या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. लोकप्रतिनिधींच्या दट्ट्यानंतर मनपा प्रशासनाला आखेर जाग आली. बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी महापालिका मुख्यालय ते चंपा चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेत तब्बल ५० पेक्षा अधिक अतिक्रमण यावेळी महानगरपालिकेने जमीनदोस्त केली आहेत.