Thursday, September 12, 2024 11:43:52 AM

Bhimashankar
'राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी समृद्ध आनंदी होऊ दे

भीमाशंकर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे. शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे. सर्व विभागातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे, अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री