Sunday, November 09, 2025 03:54:44 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून रोजी अर्थसंकल्प सादर केला. यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही योजना जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून रोजी अर्थसंकल्प सादर केला. यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे. 

पात्रता निकष

  1. महिलेचे वय २१ ते ६० दरम्यान असावे
  2. महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
  3. महाराष्ट्रातील लग्न झालेल्या, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  4. पात्र महिलेचे बँकेत खाते असावे
  5. महिला ज्या कुटुंबाची सदस्य आहे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे

कोणाला लाभ घेता येणार नाही

  1. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत आहेत. तसेच कुटुंबातील सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन सुरू आहे अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  2. ज्या कुटुंबातील सदस्य आयकर विभागात कर भरतात त्या कुटुंबातील महिला योजनेचा लाभ घरू शकत नाही.
  3. ज्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत. त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील.
  4. ज्या कुटुंबातील सदस्यांची एकत्रितपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्या महिला लाभ घेऊ शकत नाही.


सम्बन्धित सामग्री