छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार आहे. २ ऑगस्ट रोजी शुक्रवारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सिल्लोड येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.