नाशिक : 'स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी' असं म्हटलं जातं, पण अलिकडच्या कलियुगात वयोवृध्द आईची मालमत्ता हडपण्यासाठी तिच्या स्वतःच्या मुलानेच तिला त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार आल्यावर त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत वृध्द आईला न्याय मिळवून दिला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
स्वतःच्याच मुलाकडून आईची फसवणूक
80 वर्षीय सुवर्णकोर सचदेव नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात राहतात. पतीच्या निधनानंतर सुवर्णकोर यांनी मुलांचे संगोपन केले. सुवर्णकोर यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा राहत होता. त्याने आईच्या खोट्या सह्या घेवून घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. हक्काच्या घरासाठी सुवर्णकोर आजीने न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतला. न्यायालयात धाव घेताच मुलाने सुवर्णकोरना त्रास द्यायला सुरूवात केली. मुलाच्या त्रासाला कंटाळून सुवर्णकोर यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सुवर्णकोर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार येताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आजीला न्याय दिला.
हेही वाचा : 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण; सरकारचा निर्णय
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरण तपासून मुलाने कब्जा केलेले घर पुन्हा सुवर्णकोर यांना देण्याचे दिले. आईचे उपकार विसरून तिला बेघर करणाऱ्या मुलाला प्रशासनाने धडा शिकवला. 80 वर्षीय आजीला न्याय मिळाल्याने समाधानी सुवर्णकोर आजीने मुख्यमंत्री आणि प्रशासनाचे आभार मानले.