चीनने पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात धडाकेबाज झेप घेतली आहे. Huawei आणि China Unicom या नामांकित कंपन्यांनी मिळून सहकार्याने हुवाई प्रांतातील झिओंगआन न्यू एरियामध्ये पहिले 10G क्लाउड ब्रॉडबँड नेटवर्क लॉन्च केले.
ही सेवा 50G PON (Passive Optical Network) तंत्रज्ञानावर आधारित असून, ती इंटरनेटचा वेग आणि प्रतिसाद वेळेचा दर्जा लक्षणीयरीत्या सुधारते. पारंपरिक गीगाबिट इंटरनेटच्या तुलनेत, आता एका युजरसाठीचा वेग 10G स्तरावर पोहचतो आणि विलंब (Latency) फक्त काही मिलीसेकंदांमध्ये कमी होतो.
रिअल-टाइम टेस्टमध्ये:
डाउनलोड स्पीड: 9834 Mbps
अपलोड स्पीड: 1008 Mbps
पिंग: 3 ms
जिटर: 0.00 ms
ही प्रचंड वेगवान सेवा 8K व्हिडिओ स्ट्रीमिंग, क्लाऊड गेमिंग, व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) यांसारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनं वापरणं अधिक सहज आणि प्रभावी करणार आहे.
याचबरोबर, जानेवारी 2025 पर्यंत चीनकडे 4.25 मिलियन 5G बेस स्टेशन असून, चीन या क्षेत्रात आघाडीवर आहे.
आणखी एक प्रगती म्हणजे Chang Guang Satellite Technology कंपनीने लेझर कम्युनिकेशन वापरून उपग्रहातून पृथ्वीवर डेटा पाठवताना 100 Gbit/s वेग गाठला आहे, जो याआधीच्या सर्व रेकॉर्डपेक्षा 10 पट अधिक आहे.
जगभर जिथे देश अजून 5G नेटवर्क स्थापन करण्यात गुंतले आहेत, तिथे चीन 10G नेटवर्क आणि उपग्रह लेझर संप्रेषणासारख्या भविष्यातील टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या उंचीवर पोहोचला आहे.