अहमदनगर : सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करा, मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्या अशा विविध मागण्यांसाठी उपोषण आणि बंदचे आयोजन केले आहे.