Thursday, November 13, 2025 02:19:57 PM

दिल्लीतून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

दिल्ली पोलिसांची अमली पदार्थांच्या विरोधातली मोठी कारवाई

दिल्लीतून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली : दिल्लीच्या पश्चिमेकडील भागातून २०० किलो कोकेन जप्त करण्यात आले. ही जप्ती दिल्ली पोलिसांनी केली. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे दोन हजार कोटी रुपये आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी ५६० किलो कोकेन आणि ४० किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५६२० कोटी रुपये एवढी होती. एकाच आठवड्यात दिल्ली पोलिसांनी दोन कारवायांतून अमली पदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला. तसेच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना अनेकांना पकडले. अमली पदार्थांच्या विरोधातली या वर्षातली ही देशातली सर्वात मोठी कारवाई आहे.

           

सम्बन्धित सामग्री