नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील एक प्रकार उघड झाला आहे. भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे भाजपाने मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप भोकर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार तिरुपती कदम कोंढेकर यांनी केला आहे. यावर भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभव दिसत असल्याने काँग्रेस असा आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नांदेडमधील अर्धापूर येथे भाजपाने मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस उमेदवाराकडून करण्यात आला. यासंबंधी काही व्हिडीओही समाज माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आले. अर्धापूरमधील एका मंगल कार्यालयात मतदार आले होते. या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी त्या ठिकाणी वाद घातला. त्यानंतर मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले. मतदार बाहेर पडतानाचा व्हिडीओ काँग्रसकडून व्हायरल करण्यात आला आहे. यातूनच भाजपाने मतदारांना डांबून ठेवले असल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसच्या आरोपाचे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी खंडण केले आहे. कोणालाही डांबून ठेवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले खासदार अशोक चव्हाण ?
कोणालाच डांबून ठेवण्याची आम्हाला गरज नाही. असा कुठलाच प्रकार आमच्याकडून घडला नाही. सकाळपासून आमची विजयाकडे घोडदौड होती. त्यामुळे पराभव दिसत असल्याने काँग्रसकडून आरोप केले जात आहे असे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. याउलट मतदान केंद्रात घुसून मतदारांना आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रयत्न काँग्रसेकडून करण्यात आला. या घटनेची दखल प्रशासनाने घेतली आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागवलेले आहेत. काँग्रसने आरोप करण्यापेक्षा पुरावे सादर करावे अशी टीका खासदार चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेसने मतदारांना डांबून ठेवल्याच्या आरोपावर अशोक चव्हाण यांनी भाष्य केले. मतदारांना डांबून ठेवण्याची गरज नसल्याचे म्हणत खासदार चव्हाणांनी आरोप फेटाळले आहेत. उलट काँग्रेसने मतदान केंद्रात घुसून मतदान त्यांच्या बाजूने होण्यासाठी प्रयत्न केला. त्यांची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मतदान केंद्रात काँग्रेसकडून झालेल्या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज मागवला आहे. तर आरोप करण्यापेक्षा आता पुरावे सादर करा असे चव्हाणांनी म्हटले आहे.