मुंबई : मविआच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने शिउबाठा आणि राशपच्या निवडक मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांसाठी चाचपणी केली.
आतापर्यंत काँग्रेसने १७२ मतदारसंघांमध्ये चाचपणी केलीय. यात मराठवाड्यातील ४६, उत्तर महाराष्ट्रातील ४६, पश्चिम महाराष्ट्रातील ५०, अमरावती विभागातील ३० मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस १९ सप्टेंबरला ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतील ४० मतदारसंघांची चाचपणी करणार आहे. यानंतर २२ आणि २३ सप्टेंबरला काँग्रेस नागपूर विभागातील ३२ मतदारसंघांची चाचपणी करणार आहे. मुंबईतील ३६ जागांसाठीची चाचपणी काँग्रेस २४ आणि २७ सप्टेंबरला करणार आहे.
विद्यमान आमदार ज्यांचा असेल तो मतदारसंघ त्याच पक्षाला मिळेल. पण विद्यमान आमदार पक्ष सोडून विरोधी गटात गेला असेल आणि काँग्रेस त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असेल तर संबंधित जागांवर दावा करण्याबाबत विचार करू, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.