धुळे : काँग्रेसला देशात जातीय तेढ निर्माण करायची आहे. एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस दररोज अपमान करत आहे. आरक्षणाचे विरोधक काँग्रेसच आहे. काँग्रेसला दलित आणि आदिवासींची प्रगती बघवत नाही. लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजनेलाही काँग्रेसनेच विरोध केला. या योजनेला बंद पाडण्यासाठी न्यायालयात याचिका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. याउलट महायुती प्रगतीसाठी काम करत आहे. महायुतीच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत आघाडीवर आहे. आमचे सरकार असतानाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते धुळे जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.