डोंबिवली : सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच. गेली काही वर्षे नमो रमो नवरात्री या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो. डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षाचे विशेष आकर्षण म्हणजे पूर्ण वातानुकूलित ७० हजार स्क्वेअर फूट प्लेयिंग अरेना आहे. त्यासाठी १३५ फूट बाय ५०० फूट अशा भव्य वातानुकूलित डोमची निर्मिती केली आहे. मराठी हिंदी गुजराती रंगभूमी मालिका आणि चित्रपट कलाकार नमो रमो नवरात्री उत्सवात दरवर्षी आवर्जून हजेरी लावत आहेत. प्रतिष्ठापना ते नवमी असा नऊ रात्रींचा गरबा एक आनंददायी आणि भरपूर ऊर्जा देणारा अनुभव असतो. दसऱ्याच्या दिवशी होणारे रावण दहन पाहण्यासाठी तर अलोट गर्दी होते.