मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महिन्याभरात आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्यांदा भेट घेतल्यावर त्यावर आरोप-प्रत्योरापांची राळ उडू लागली आहे. महायुतीच्या नावाने शिव्यांच्या लाखोल्या वाहणाऱ्या महाविकास आघाडीतील नेते आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सरड्यापेक्षाही रंग बदलतात अशी बोचरी टिका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना डिवचलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
भेटीचे कारण मतदारसंघातील कामाचा दिला जातोय. त्यात राजकीय चर्चा झाली नसली तरी भेटीनंतर राजकीय वादाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री भेटीवर उठलल्या चर्चेच्या वादळात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या लोकांनी सरकार आल्यावर बर्फावर झोपवू असं म्हटलं तेच लोक आता मुख्यमंत्री याना भेटत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
हेही वाचा : 25 जानेवारीपासून जरांगे पुन्हा उपोषणाला
आदित्य ठाकरे यांच्या भेटीने आणि सामनातून झालेल्या स्तुतीनंतर ठाकरे गट फडणवीसांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न होताहेत.