No Holi in these Countries : भारतात होळी आणि धुळवड उत्साहाने साजरी केली जाते, परंतु जगातील काही इस्लामिक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणे कडक नियमांमुळे निषिद्ध आहे. काही देशांमध्ये कट्टर सांप्रदायिक सरकारांमुळे कायदे अत्यंत जाचक आहेत. अशा ठिकाणी रंग उधळल्यास किंवा धुळवड साजरी केल्यास थेट तुरुंगवास, दंड किंवा चाबकाचे फटके अशी कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या देशांमध्ये सार्वजनिकरीत्या होळी साजरी करणे अशक्य आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट आणि बंदी
अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानची सरकार असल्याने तिथे धार्मिक नियम अत्यंत कठोर आहेत. या देशात हिंदू आणि शिखांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणे किंवा मिरवणूक काढण्यास तिथे सक्त मनाई आहे. होळीचा सण केवळ मंदिर परिसरात किंवा घरातील खासगी जागेतच साजरा केला जाऊ शकतो. सार्वजनिक मैदानात रंगपंचमी खेळण्याचा प्रयत्न केल्यास कडक कायदेशीर शिक्षा होऊ शकते.
हेही वाचा - Rat Poison on Fruits: मालाडमध्ये धक्कादायक प्रकार; उंदरांचे विष लावलेली फळे विकणाऱ्या दोन विक्रेत्यांना अटक, पाहा व्हिडीओ
सौदी अरब, कतार आणि ओमानमधील नियम
- सौदी अरब: या देशात होळी आणि धुळवड साजरी करण्यास पूर्णपणे मनाई आहे. भारतीय प्रवासी केवळ दुतावासात किंवा खासगी जागेतच हा सण साजरा करू शकतात.
- कतार आणि ओमान: या देशांमध्येही धार्मिक नियम कडक आहेत. परंतु, भारतीयांना त्यांच्या मंदिरांमध्ये किंवा खासगी आवारात सण साजरा करण्याची मुभा आहे. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यास येथेही मनाई आहे. प्रशासनाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी रंग खेळल्यास दंड किंवा कारवाई होऊ शकते.
कायदेशीर गुन्हा आणि कडक शिक्षा
अनेक इस्लामिक देशांमध्ये सार्वजनिकरीत्या हिंदू सण साजरे करणे कायदेशीर गुन्हा मानला जातो. स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार शिक्षा होऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट तुरुंगवास किंवा चाबकाचे फटके मारण्याची शिक्षाही दिली जाऊ शकते. हे सर्व शिक्षेचे प्रमाण तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून असते. या देशांमध्ये होळीचा आनंद केवळ घराच्या चार भिंतींच्या आतच मर्यादित राहतो.
हेही वाचा - Surgical Scissors Left in Stomach : डॉक्टरांचा मोठा हलगर्जीपणा; शस्त्रक्रियेनंतर पोटातच विसरली कात्री