Tuesday, November 18, 2025 02:56:28 AM

ICC क्रमवारीत भारताचे वर्चस्व! जगातील टॉप-10 फलंदाजांमध्ये 9 भारतीय खेळाडूंचा समावेश

ICC तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी20) क्रमवारी जारी करते. या तिन्ही फॉरमॅटच्या टॉप 10 यादीमध्ये भारताचे 9 खेळाडू समाविष्ट आहेत.

icc क्रमवारीत भारताचे वर्चस्व जगातील टॉप-10 फलंदाजांमध्ये 9 भारतीय खेळाडूंचा समावेश

ICC Batting Rankings Top 10 Players : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) संघांच्या क्रमवारीसोबतच सर्व खेळाडूंच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवरही लक्ष ठेवते. ICC क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. टेस्ट, वनडे आणि टी20 या तिन्ही फॉरमॅटमधील फलंदाजांच्या टॉप-10 क्रमवारीत मिळून भारताच्या तब्बल 9 खेळाडूंचा समावेश आहे. या यादीमध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांच्यासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

ICC क्रमवारीत भारताचे 9 स्टार खेळाडू
ICC तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी20) क्रमवारी जारी करते. या तिन्ही फॉरमॅटच्या टॉप 10 यादीमध्ये भारताचे 9 खेळाडू समाविष्ट आहेत. या 9 स्टार खेळाडूंची नावे अशी आहेत:
- यशस्वी जैस्वाल
- रोहित शर्मा
- विराट कोहली
- शुबमन गिल
- श्रेयस अय्यर
- सूर्यकुमार यादव
- ऋषभ पंत
- अभिषेक शर्मा
- तिलक वर्मा

टेस्ट फलंदाजी क्रमवारीत 2 भारतीय
ICC टेस्ट फलंदाजी क्रमवारीत टॉप-10 मध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा फायदा ओपनिंग फलंदाज यशस्वी जैस्वालला झाला आहे. आयसीसी क्रमवारीत जैस्वाल दोन स्थानांनी वर चढला आहे. यशस्वी जैस्वाल 791 रेटिंग पॉइंट्ससह ICC टेस्ट फलंदाजी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत 753 रेटिंग पॉइंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा - ODI World Cup: रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? गौतम गंभीरने केलं धक्कादायक विधान ,म्हणाला 'त्यांचा अनुभव संघासाठी...

वनडे क्रमवारीत 4 भारतीय
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे ICC वनडे फलंदाजी क्रमवारीत टॉप-10 मध्ये 4 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल 784 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा 756 रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली 736 रेटिंग पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यर 704 रेटिंग पॉइंट्ससह नवव्या क्रमांकावर आहे.

टी20 क्रमवारीत 3 भारतीय
ICC टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीच्या टॉप-10 यादीत भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत भारताचा ओपनिंग फलंदाज अभिषेक शर्मा 926 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आपले वर्चस्व कायम ठेवून आहे. भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्मा 819 रेटिंग पॉइंट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव 698 रेटिंग पॉइंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा - Indian Premier League: IPL मध्ये सलग दुसऱ्या वर्षी ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी घट, चाहत्यांची आवड कायम असूनही मोठे आर्थिक नुकसान; कारण जाणून थक्क व्हाल


सम्बन्धित सामग्री