मुंबई : केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कमांडो पथकाला अर्थात एनएसजीला अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या कामातून दूर केलं आहे. नऊ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा यापुढे सीआरपीएफकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेत विशेष प्रशिक्षित सैनिकांची नवीन तुकडी देण्याला गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील दोन्ही दलांमधील जबाबदाऱ्यांचे हस्तांतरण येत्या महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्र सरकारने का केला बदल?
या निर्णयामुळे ४५० 'ब्लॅक कॅट' कमांडो होणार मुक्त
एनएसजीचा मूळ उद्देश विशेषतः दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी मोहीम हाताळणे हा आहे
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्याचं अतिरिक्त काम एनएसजीला करावं लागत होतं