नागपूर : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित केले. आजपर्यंत भारत वगळता इतर कोणत्याही देशाने वैश्विक विकासाचा मार्ग निवडलेला नाही. पण भारताला रोखण्याचा आणि त्याला पुढे जाऊ न देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे जगातील अनेक शक्तींचा हात असल्याचे ते म्हणाले. समाजाने संघटीत होणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारांचा तसेच या प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी निषेध केला. हिंदूंना संघटीत होण्याचे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.