सिंधदुर्ग : दीपक केसरकर यांच्यावर शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता, त्यावर आमदार दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या वयावर आणि त्यांच्या अक्कलवर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना समज आणि अक्कल नाही, तसेच त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे शिवसेनेचे तुकडे पडले आहेत.
दीपक केसरकर पुढे म्हणाले, "आदित्य ठाकरेंना समज नाही. त्यांच्या वयाइतकीही त्यांना अक्कल नाही. त्यांना शालेय ड्रेस खरेदी करताना अकरा हजार कोटींचं कमी टेंडर अदा केले. आदित्य ठाकरेंना म्युनिसिपल मधून करोडो रुपये मिळतात, आणि ते त्याला 'खोके' म्हणतात. याचाच अर्थ त्यांना कमी पैसे मिळाले की 'मलाई' म्हणतात, ही त्यांची सवय आहे."
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
केसरकर यांनी एक गंभीर आरोप करत सांगितले की, आदित्य ठाकरेंमुळेच आज शिवसेनेचे तुकडे पडले. "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एक मिटींग फिक्स केली होती, मात्र त्यात आदित्य ठाकरेंनी अडसर घातला. त्या मिटींगमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांत महायुतीचे सरकार आणू अशी मुदत मागितली होती, पण आदित्य ठाकरे मिटींगला उपस्थित न राहिले. यावरून हे स्पष्ट होते की त्यांना हिंदुत्वाची काही पर्वा नव्हती, त्यांना आघाडीबरोबर जाऊन सरकार बनवायचं होतं," असे केसरकर म्हणाले.
"आदित्य ठाकरेंना 130 कोटींचं टेंडर 11 हजार कमी करून 124 कोटींमध्ये मिळालं, हे भ्रष्टाचार कसं होईल?" शेवटी, दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना खुले चॅलेंज दिलं. "मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो. जर मुंबईतील एक बिल्डर किंवा एक कॉन्ट्रॅक्टर मला एक रुपयाही दिला असेल, तर मी माझं राजकारण सोडेन," असं त्यांनी म्हटलं.