कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही तपासणी केली. या तपासणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कोल्हापूरमध्ये पाच नोव्हेंबर रोजी फडणवीस यांची बॅग तपासण्यात आली होती. पण या तपासणीबाबत फडणवीस आणि भाजपाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली नाही. या उलट उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथे बॅग तपासण्यात आली म्हणून नाराजी व्यक्त केली.
नियमानुसार आचारसंहितेच्या काळात प्रचाराच्या सामानाची तसेच प्रचार करत असलेल्या व्यक्तींसोबतच्या सामानाची तपासणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. यामुळे फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी झाली म्हणून त्यांनी किंवा भाजपाने नाराजी व्यक्त केली नव्हती. पण उद्धव यांनी बॅग तपासल्याचा मुद्दा पुढे करत नाराजी व्यक्त केली. मोदी - शाह - शिंदे - फडणवीस यांच्या बॅगा तपासता का ? अशा स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले.