Saturday, February 08, 2025 06:20:43 PM

Devendra Fadnavis
'मलिकांबाबतच्या भूमिकेवर ठाम'

नवाब मलिकांबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मलिकांबाबतच्या भूमिकेवर ठाम

मुंबई : नवाब मलिकांबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवाब मलिक यांच्यावर १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातून-`~` निर्दोष मुक्तता होईपर्यंत नवाब मलिकांना कोणत्याही निवडणुकीचे तिकीट देऊ नये, अशी फडणवीस यांची भूमिका आहे, या भूमिकेवर ठाम असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

आमदार झिशान यांची काँग्रेवर टीका

आमदार झिशान सिद्दीकी यांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांच्या मंचावर जाऊन काँग्रेसवर टीका केली. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा मुंबईत आली, त्यावेळी अजित पवार आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी एकाच वाहनाच एकत्र होते. अजित पवारांच्या नेतृत्वात मुंबईत आमदार नवाब मलिक आणि आमदार झिशान सिद्दीकी या दोघांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन झाले. आमदार नवाब मलिक यात्रेत अनुपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.


सम्बन्धित सामग्री