Saturday, January 25, 2025 08:41:41 AM

Devendra Fadnavis Interview
मी बेस्ट सीएमसाठी नाही, जनतेचं काम करण्यासाठी आलोय

मी बेस्ट सीएमसाठी नाही, जनतेचं काम करण्यासाठी आलोय असं नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटंलय.  फडणवीसांच्या मुलाखातीतले महत्वाचे मुद्दे पाहुयात. 

मी बेस्ट सीएमसाठी नाही जनतेचं काम करण्यासाठी आलोय

प्रश्न - शिंदे नाराज होते, तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करत होते? 
फडणवीस - "शिंदेंनी चांगलं काम केलं. अडीच वर्षात आम्ही सर्वांनी टीम म्हणून चांगलं काम केलं. माझे सहकारी जर लोकांच्या मनात जागा मिळवत असतील, तर मला त्याचा आनंद आहे. मी बेस्ट सीएमसाठी नाही, जनतेचं काम करण्यासाठी आलोय."

प्रश्न - मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत बरीच खलबतं झाली...शिंदेंची नाराजी कशामुळे होती. 
फडणवीस - शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास इच्छुक नव्हते मात्र मुख्यमंत्री भाजपचा होणार हे एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पहिल्याच बैठकीत मान्य केलं होतं. आम्ही 132 जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होणार हे पक्षाने ठरवलं होतं, मात्र एकनाथ शिंदेंच्या पक्षात दोन मतप्रवाह होते. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं, असं अनेकांच मत होतं पण काहींच असं सुद्धा मत होतं की, एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी कॉर्डिनेशन कमेटीच चेअरमन बनावं. पण त्यांनी अखेर उपमुख्यमंत्री होण्याची विनंती मान्य केली. 

प्रश्न - विरोधकांनी तुमच्यावर खुप टीका केली, तुम्हाला एक प्रकारे टार्गेट केलं.
फडणवीस - "मी विरोधकांचे आभार मानतो, त्यांनी मला टार्गेट केलेलं जनतेला आवडलं नाही. मी सगळ्यांना माफ केलंय हाच माझा बदला... जनतेने विकासाला आणि मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' च्या नाऱ्याला प्रतिसाद दिला. हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही कायम धरून ठेवला आणि त्याचा फायदा आम्हाला झाला. 

प्रश्न - एकनाथ शिदें येत नसतील तर आपण शपथ घेऊन टाकूयात, असा काही प्रस्ताव अजित पवारांकडून आला होता का ?
फडणवीस - असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. आम्ही तिघं मिळूनच प्रभावीपणे सरकार चालवणार हे सुरूवातीपासुनच ठरवलेलं त्यामुळे कोणालाही डावलून सरकार बनवण्याचा प्रश्नच येत नाही. 

प्रश्न - अजित पवार कायमचे उप-मुख्यमंत्री यावर खुप मीम्स सोशल मिडियावर आलेत
फडणवीस - हो, खूप मजेदार मीम्स दिसले, त्यामुळे आमचं देखील चांगलंच मनोरंजन झालं. आम्ही देखील एकमेकांना हे मीम्स पाठवत होतो. एका मीममध्ये अजित पवार एका खुर्चीवर बसलेत त्यावर उपमुख्यमंत्री लिहलेलं होतं, आणि ते म्हणतात की, मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर कोणालाही बसवा मी तर उपमुख्यमंत्री म्हणून पर्मनंट आहे. 

प्रश्न - विजयाचं श्रेय कोणाला द्याल?
फडणवीस - विजयाचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेला देईल. कित्तेक वर्षानंतर इतकं मोठं यश मिळालंय. आम्ही महिला, शेतकरी, तरुणांसाठी योजना आणल्या, जनतेनं मोदींवर विश्वास टाकलाय. २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांशी मी तुलना केली, तर मी स्वताला मॅच्युअर समजतो.."


सम्बन्धित सामग्री