Saturday, January 25, 2025 09:04:05 AM

modi-jacket-kolhapur-oath-ceremony
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी खास 'मोदी जॅकेट' भेट

या जॅकेटमध्ये भगव्या रंगाचा वापर केला असून त्यावर भाजपाचे प्रतीक असलेले कमळ चिन्ह रेखांकित केले गेले आहे. हे जॅकेट फडणवीस यांना एक खास भेट म्हणून तयार करण्यात आले आहे

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी खास मोदी जॅकेट भेट

कोल्हापूर : कोल्हापुरातील अर्बन स्टोरी दुकानाने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास 'मोदी जॅकेट' तयार केले आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळ्यात ५ वाजता सहभागी होणार आहेत. त्यापूर्वीच कोल्हापूरमध्ये असलेल्या अर्बन स्टोरी या शोरूममध्ये फडणवीस यांच्यासाठी विशेष जॅकेट तयार करण्यात आले आहे.

या जॅकेटमध्ये भगव्या रंगाचा वापर केला असून त्यावर भाजपाचे प्रतीक असलेले कमळ चिन्ह रेखांकित केले गेले आहे. हे जॅकेट फडणवीस यांना एक खास भेट म्हणून तयार करण्यात आले आहे आणि ते शपथविधीसाठी वापरावे, अशी शोरूमचे व्यवस्थापक आशिष शहा यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा हा उपक्रम फडणवीस यांच्याशी असलेल्या आपुलकीचे नाते सिद्ध करते. 

अर्बन स्टोरीच्या टीमने फडणवीस यांना एक रात्रीत हे जॅकेट तयार करून पाठवले. शहा यांच्या मते, फडणवीस यांच्यासाठी हा एक खास आणि अभिमानाचा क्षण आहे. ज्या प्रकारे भाजपाचे प्रतीक कमळ चिन्ह जॅकेटवर दाखवले आहे, त्यातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेतृत्वाचे प्रतीक आणि त्यांचे लोकप्रियतेचा ठसा उमठवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरत आहे, आणि त्यासाठी कोल्हापुरातील अर्बन स्टोरीने दिलेल्या या खास भेटीचा महत्त्वपूर्ण क्षण ठरावा.


सम्बन्धित सामग्री