Monday, February 10, 2025 05:42:52 PM

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

शिर्डीतील या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

शिर्डी : भारतीय जनता पार्टीचे आज अधिवेशन पार पडले. शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिर्डीतील या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

लोकसभेला व्होट जिहाद पाहायला मिळाला

लोकसभेला संविधानविरोधी प्रवृत्तीचा प्रादुर्भाव दिसला. विरोधकांनी महाराष्ट्रात फेक नरेटिव्ह पसरवला आहे. लोकसभेला व्होट जिहाद पाहायला मिळाला अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली. मालेगावात बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे. घुसखोरांच्यामार्फत अराजकता पसरवणं सुरू असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

हेही वाचा : भाजपा अधिवेशनातून शाह यांचा पवार आणि ठाकरेंवर निशाणा

 

'लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'

विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली.  या योजनेतून सरकारने राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रूपये देणे सुरू केले. डिसेंबरपर्यंत महिलांना योजनेचे पैसे मिळाले आहेत. आता महिलांना जानेवारीच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. मात्र या योजनेविषयी बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. लाडक्या बहिणींना सरसकट पैसे मिळणार नाही. तसेच त्यांच्या अर्जाची पाहणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केले आहे. लाडकी बहीण योजनेविषयी सुद्धा फेक नरेटिव्ह पसरवणं सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा विश्वास यावेळी फडणवीसांनी लाडक्या बहिणींना दिला आहे. योजनांबद्दल विरोधक गैरसमज पसरवत आहेत असेही यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे.

 


सम्बन्धित सामग्री