DhanTrayodashi 2025 : शास्त्रांनुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा पवित्र सण साजरा केला जातो. दिवाळीच्या महापर्वाची सुरुवात याच दिवसापासून होते. या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेर या दोघांची कृपा मिळवण्यासाठी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
धनत्रयोदशी 2025 कधी आहे?
पंचांगनुसार, 2025 मध्ये त्रयोदशी तिथीची सुरुवात 18 ऑक्टोबर (शनिवार) रोजी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी होईल आणि समाप्ती 19 ऑक्टोबर (रविवार) रोजी दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी होईल. हिंदू धर्मात उदया तिथी महत्त्वाची मानली जात असल्याने, धनत्रयोदशीचा सण 18 ऑक्टोबर 2025, शनिवार रोजी साजरा केला जाईल.
सोनं-चांदीसोबतच 'या' वस्तू खरेदी करणे शुभ!
जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर निराश होऊ नका. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार, खालील वस्तू खरेदी करणे देखील घरात सुख-समृद्धी आणते:
1. भांडी (धातूची):
पितळ : पितळ हा भगवान धन्वंतरी यांना प्रिय असलेला धातू मानला जातो. या दिवशी पितळेची भांडी खरेदी केल्याने घरात आरोग्य, सौभाग्य आणि 13 पटीने धनलाभ होतो, अशी मान्यता आहे.
तांबं किंवा कांस्य : या धातूंची भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ फलदायी ठरते.
हेही वाचा - Festival Eco Ideas: पुजेची फुले वाया घालवू नका! 'या' फुलांपासून बनवा घरच्या घरी धूप-अगरबत्ती, जाणून घ्या सोपी पद्धत
2. झाडू:
झाडू हे लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरातून दारिद्र्य दूर होते आणि सुख-समृद्धीचा वास येतो. हा झाडू घरात आणल्यावर वापरण्यापूर्वी त्याची पूजा अवश्य करावी.
3. धण्याचे बी (धणे):
धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करून ते लक्ष्मी देवीला अर्पण करणे शुभ असते. धणे हे धनाचे प्रतीक मानले जातात. पूजेनंतर हे बी आपल्या तिजोरीमध्ये किंवा धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास बरकत येते.
4. लक्ष्मी-गणेश मूर्ती:
दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशाची नवीन मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी विधीवत पूजा केल्यास धन-वैभव प्राप्त होते.
5. श्री यंत्र आणि कुबेर यंत्र:
जर सोनं-चांदी खरेदी करणे शक्य नसेल, तर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तांबे, पितळ, सोने किंवा चांदी यापैकी आपल्याला शक्य असेल त्या धातूचे श्रीयंत्र खरेदी करून त्याची पूजा करू शकता. धनत्रयोदशी दिवशी श्रीयंत्राचे पूजन करून ते घरातील तिजोरीमध्ये ठेवले जाते. हे यंत्र तिजोरीत स्थापित केल्यास धन आणि समृद्धीचे देवता कुबेर यांची कृपा राहते.
6. गोमती चक्र आणि कौडी:
गोमती चक्र पवित्र मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी 11 गोमती चक्रे खरेदी करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते.
पिवळी कौडी ही लक्ष्मीशी जोडलेली आहे. ही खरेदी करून हळद लावून (असल्यास) दिवाळीच्या रात्री पूजेनंतर तिजोरीत ठेवल्यास घरात धनाचा प्रवाह टिकून राहतो.
खरेदी करताना 'या' गोष्टी टाळा
काळ्या रंगाच्या वस्तू : धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू किंवा वस्त्र खरेदी करणे अशुभ मानले जाते, त्यामुळे ते टाळावे.
लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तू : या दिवशी लोखंडापासून बनलेल्या सुई, कात्री किंवा चाकू यांसारख्या टोकदार वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे.
हेही वाचा - Sadetin Shakti Peeh : ही आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं; जाणून घेऊया त्यांच्या जन्माची कथा
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)