Sunday, March 08, 2026 10:50:43 PM

Holi 2026 : नारळ सगळ्या घरातून फिरवून होळीत का अर्पण करतात? 'हे' आहे या प्रथेमागचं कारण

Holi 2026 : होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा, परंपरा महाराष्ट्रातील विविध भागांत पाळल्या जातात. यापैकीच एक म्हणजे होळीला नारळ अर्पण करण्याची प्रथा. जाणून घेऊ, या प्रथेमागील श्रद्धा..

holi 2026   नारळ सगळ्या घरातून फिरवून होळीत का अर्पण करतात हे आहे या प्रथेमागचं कारण

Coconut Offering in Holi : भारतात होळीचा सण म्हणजे उत्साह, चैतन्य आणि रंगांचा संगम. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा हा उत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. 2 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या मुहूर्तावर होलिका दहन केले जाईल, तर 3 मार्च 2026 रोजी धूलिवंदनाचा आनंद लुटला जाईल. महाराष्ट्रात होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा आहेत, त्यापैकीच एक महत्त्वाची प्रथा म्हणजे पेटत्या होळीत नारळ अर्पण करणे.

होळीत नारळ का अर्पण करतात? 
होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. पण, होळीत नारळ का आणि कशासाठी टाकला जातो हे अनेकांना माहीतच नसते. होळीत नारळ अर्पण करण्यामागची धार्मिक भावना काय आहे, याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मात नारळाला 'श्रीफळ' मानले जाते, जे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. होळीच्या पवित्र अग्नीत नारळ अर्पण करण्यामागे अनेक श्रद्धा आहेत:
- समर्पण: नारळ हा मानवी अहंकाराचे प्रतीक मानला जातो. अग्नीत नारळ अर्पण करणे म्हणजे आपला अहंकार आणि वाईट विचार जाळून टाकून शुचिर्भूत होणे होय.
- नैवेद्य: अग्नी देवतेला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीफळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सुख-शांती लाभते, अशी भाविकांची श्रद्धा असते.
- परंपरा: अनेक ठिकाणी नारळ होळीत भाजला जातो आणि नंतर तो प्रसादरूपात वाटला जातो. हा भाजलेला नारळ आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.
- पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व : नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळाला कामधेनु तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे. 
- शुभ आशीर्वाद : तसेच, घरातील व्यक्तींवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते. त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की, नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. 
- अशीही काहींची धारणा : तसेच, होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते अशी सुद्धा मान्यता आहे.

नारळ होळीत अर्पण करण्यापूर्वी घराची दृष्ट काढली जाते 
होळी हा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी श्रीफळाने घराची दृष्ट काढली जाते. घराची दृष्ट कशी काढताना या दिवशी घराच्या चारही कोपऱ्यातून श्रीफळ फिरवले जाते. तसेच, घरातील महत्त्वाची ठिकाणं जसे की, स्वयंपाकघर, तिजोरी यासारख्या भागांपासून दृष्ट काढावी. 

दृष्ट काढताना काय म्हणावे?
कुटुंबाची दृष्ट काढताना म्हणायचे आहे की, माझ्या घराला जर कुणाची दृष्ट लागली असेल तर ती दूर होऊ दे. 
तसेच माझ्या घरातील माणसांना कुणाची दृष्ट लागली असेल तर ती दूर होऊ दे. 
किंवा घरात जर कोणती निगेटिव्ह एनर्जी आली असेल तर ती घरातून बाहेर पडू दे म्हणून नारळ फिरवला जातो. 

हेही वाचा - Holika Dahan Puja Samagri List: होळीच्या पूजेसाठी कोणत्या वस्तू आवश्यक? पहा पूजा साहित्याची संपूर्ण यादी एका क्लिकव

होळी: वाईटावर चांगल्याचा विजय
होळीचा सण प्रल्हाद आणि होलिका यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. जेव्हा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलिका त्याला घेऊन अग्नीत बसली, तेव्हा विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि अनिष्ट वृत्तीची होलिका भस्मसात झाली. म्हणूनच आजही लोक आपल्यातील मत्सर, राग आणि द्वेष यांसारख्या 'होलिका' वृत्तींना अग्नीत अर्पण करून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करतात.

सामाजिक ऐक्याचे प्रतीक
होळी हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक सलोख्याचा दुवा आहे. या दिवशी लोक एकमेकांमधील जुने मतभेद विसरून एकत्र येतात. महाराष्ट्रात कोकण असो वा विदर्भ, प्रत्येक ठिकाणी होळी साजरी करण्याची ढब वेगळी असली तरी त्यातील गाभा एकच असतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी होणारी रंगांची उधळण मानवी जीवनातील वैविध्य आणि आनंद दर्शवते.

हेही वाचा - Holi 2026: देशातल्या 'या' ठिकाणी अनोख्या पद्धतीने साजरा होतो रंगांचा सण; कुठे कपडे फाडले जातात तर कुठे लाठ्यांचा वर्षाव! 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री