धाराशिव : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज धाराशिव येथे जनआक्रोश मोर्चा झाला. या मोर्चात आमदार सुरेश धस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आकावरही मकोक लावा असे म्हणत त्यांनी वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. बीड, परभणी, संभाजीनगर, जालना आणि आज धाराशिवमध्ये या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख आणि सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी धस यांनी आक्रमक भाषण केले. संतोष देशमुख यांना सलग चार तास मारहाण केली. आका फोनवरून आरोपींना अजून मारा असं सांगत होता. देशमुखांना मारहाण केल्याचा व्हिडिओ काढून आकाला पाठवला असल्याचा आरोप त्यांनी वाल्मिक कराडवर केला.
हेही वाचा : Torres Scam : आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार ; पुढे काय होणार?
'आकावरही मकोक लावा'
सात आरोपींवर मकोक लावला. आकावरही मकोक लावा असा निशाणा धस यांना वाल्मिक कराडवर केला आहे. पोलिसांना गुन्हा दाखल करू नका सांगणाऱ्यावरही गुन्हा दाखल करा असं म्हणत धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. आकाच देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. अजित पवार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करा असेही धस यांनी म्हटले आहे.
'हाके कुणाचीही उचल घेऊन बोलू नका'
देशमुख यांच्या हत्येवर बोलताना आमदार धस यांनी लक्ष्मण हाकेंना विनंती केली आहे. कोणाचीही उचल घेऊन बोलू नका अशी विनंती धसांनी हाकेंना केली आहे. हाकेंच्या पाया पडून विनंती कुणाचीही सुपारी घेऊन बोलू नका असे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.