Wednesday, January 14, 2026 11:58:52 AM

Jamkhed Dancer Death : रूम आतून लॉक, दरवाजा उघडताच समोर भयानक दृश्य... प्रसिद्ध नृत्यांगणेने उचललं टोकाच पाऊल

अहिल्यानगरमध्ये घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. प्रसिद्ध नृत्यांगनेने एका लॉजवर जाऊन आत्महत्या केली आहे. एवढच नव्हे तर यात राजकीय कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.

jamkhed dancer death   रूम आतून लॉक दरवाजा उघडताच समोर भयानक दृश्य प्रसिद्ध नृत्यांगणेने उचललं टोकाच पाऊल

अहिल्यानगरमध्ये घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. प्रसिद्ध नृत्यांगनेने बाजारात जात असल्याचं खोट सांगत एका लॉजवर जाऊन आत्महत्या केली आहे. एवढच नव्हे तर यात राजकीय कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. कारण याप्रकरणासंबंधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुळची कल्याण येथील असणारी रहिवासी दीपाली पाटील हिने साई लॉजवर आपलं जीवन संपवल आहे. दिपाली मुळची कल्याणी असली तरी ती तिच्या मैत्रिणीसोबत अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहत होती. तेथेच ती कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करायची. 

हेही वाचा- ED Action on Anil Ambani: ED ची मोठी कारवाई! अनिल अंबानीच्या मालकीची 1120 कोटींची मालमत्ता जप्त

मात्र सकाळी बाजारात जाते असं सांगत दिपाली घरातून बाहेर पडली होती. मात्र ती बाहेर जाऊन खूप वेळ झाला होता तरी देखील दिपाली घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या मैत्रिणीने जिकडे तिकडे तिची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र तरी देखील दिपालीचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने दिपाली ज्या रिक्षातून बाहेर गेली होती त्या रिक्षा चालकाची चौकशी केली असता त्याने दिपालीला साई लॉजवर सोडल्याची माहिती दिली. त्यानुसार तिची मैत्रीण साई लॉजवर पोहचली. लॉजवर जाऊन विचारपुस केल्यानंतर दिपालीची रुम आतून लॉक असल्याचं समजल. 

त्यामुळे लॉजवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. त्यानंतर जे समोर दिसल ते अत्यंत भयावह होत. दिपालीचा मृतदेह समोर टांगलेल्या अवस्थेत होता. दिपालीने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतला होता. हे दृष्य पाहताच घडलेल्या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र अद्याप दिपालीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. 

हेही वाचा- Avadhut Sathe: अवधूत साठेंवर SEBI ची मोठी कारवाई! 546.16 कोटी बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचे आदेश

दरम्यान दुसरीकडे दिपालीच्या नातेवाईकांचा असा आरोप आहे की, संदीप गायकवाड नावाचा एक व्यक्ती लग्नासाठी दिपालीच्या मागे लागला होता. संदीप गायकवाड हा भाजपशी निगडीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिसांकडून कसून तपासात सुरु आहे. 

तर रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (३५) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही."

https://twitter.com/RRPSpeaks/status/1996868492029772218


सम्बन्धित सामग्री