मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कार्यक्रम चंद्रपुरमध्ये असल्याने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र, या सोहळ्याला मुनगंटीवारांनी दांडी मारल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा रौप्य महोत्सवी सोहळ्यात लक्षवधी ठरली. वैयक्तितक कारणांमुळे मुनगंटीवार या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुनगंटीवार नाराज का?
सुधीर मुनगंटीवार यांना 2024 लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली होती
मात्र, त्यांना लोकसभेला विजय मिळवता आला नाही
मुनगंटीवार यांच्या पराभवामुळे पक्षाच्या वरिष्ठांची नाराजी
विधानसभेला विजय मिळवूनही मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डच्चू
महायुतीच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठांऐवजी नवोदितांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न
मंत्रिमंडळात वर्णी न लागणं मुनगंटीवारांच्या जिव्हारी लागलं
ऐनवेळी यादीतून नाव गायब झाल्याचा मुनगंटीवारांचा दावा
हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवारांची उघडपणे नाराजी
आता वैयक्तिक कारण देत मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमाला दांडी
कार्यक्रम पत्रिकेत सर्वात शेवटी नाव असल्याने नाराज असल्याची चर्चा
चंद्रपुरातील कार्यक्रम टाळून मुनगंटीवार यांचा मुंबईत मुक्काम
मुनगंटीवारांच्या अनुपस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केलीय. तसेच त्यांनी पक्षाचा नेता म्हणून त्यांच्या अनुपस्थितीचे कारण फडणवीस यांनी सांगितलंय.
हेही वाचा : मुख्यमंत्री भेटीचा वाद विकोपाला
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
चंद्रपूर हा वाघ आणि ‘वारां’चा जिल्हा आहे
मुनगंटीवार आमचे नेते आहेत. आम्ही प्रत्येक ‘वारां’चा सन्मान करतो,
कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत
हेही वाचा : 25 जानेवारीपासून जरांगे पुन्हा उपोषणाला
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर तिन्ही पक्षात नाराजी नाट्य रंगले. काहींनी उघडपणे नाराजी उघड केली तर काहींनी खासगीत नाराजीचा सूर लावला. मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत. त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदारी पक्षाने दिल्या त्यांना मुनगंटीवार यांनी न्याय देण्याचा प्रय्तन केल्याचा दावा स्वतः मुनगंटीवार यांनी केलाय. आता पक्ष त्यांना जबाबदारी देणार की त्यांच्या अशा नाराजीनाट्याकडे दुर्लक्ष करणार याची पक्षातच चर्चा आहे.