मुंबई : भाजपाने रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. संकल्पपत्र या नावाने भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. संकल्पपत्र प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना थोड्या वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एका व्यक्तीने कार्यक्रमस्थळी पत्रके फेकून घोषणाबाजी केली. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्याला ताब्यात घेतले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणावरुन तातडीने बाहेर नेले. यानंतर भाजपाचा संकल्पपत्र प्रकाशनाचा कार्यक्रम सुरळीत संपन्न झाला. गोंधळ घालणाऱ्याची चौकशी सुरू आहे.