Wednesday, January 15, 2025 04:53:50 PM

Congress
काँग्रेस भवनातून दारू आणि पैशांचे वाटप

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार भाजपाने केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.

काँग्रेस भवनातून दारू आणि पैशांचे वाटप

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार भाजपाने केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. 

पोलिसांनी स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार हे महिलांना काँग्रेस भवन येथे बोलावून दारू आणि पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर सपना मुनगंटीवार आणि शलाका मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भावनात जाण्याचा प्रयत्न केला. यातून तणाव निर्माण झाला. अखेर भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना बोलावले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिसांनी स्थानबद्ध केलेले विजय चिमडलवार यांना ताब्यात घेतले. पोलीस कारवाई सुरू असताना थोडा वेळ गांधी चौकात तणाव होता. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वृत्त आहे. 


सम्बन्धित सामग्री