Thursday, November 13, 2025 07:48:36 AM

Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या रात्री घराचे दरवाजे उघडे का ठेवले जातात? जाणून घ्या, यामागील प्राचीन पौराणिक कथा!

दिवाळीच्या रात्री लोक आपल्या घराचे दरवाजे उघडे का ठेवतात, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. यामागे एक पौराणिक कथा आहे. चला जाणून घेऊ..

diwali 2025 लक्ष्मीपूजनाच्या रात्री घराचे दरवाजे उघडे का ठेवले जातात जाणून घ्या यामागील प्राचीन पौराणिक कथा

Diwali 2025: दिवाळीचा सण अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो. यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी विधी-विधानाने पूजा केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि वर्षभर घरात सुख-समृद्धी राहते. त्यांच्या कृपेने वर्षभर घरात कोणताही अभाव निर्माण होऊ शकत नाही. म्हणजेच, कोणतीही गोष्ट कमी पडत नाही.

दिवाळीच्या रात्री लोक आपल्या घराचे दरवाजे उघडे का ठेवतात, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. यामागे एक पौराणिक कथा आहे. अशी श्रद्धा आहे की, दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात. ज्या घरांमध्ये त्यांना प्रकाश, स्वच्छता आणि श्रद्धा आढळते, त्याच घरात त्या लक्ष्मीचा वास करतात. त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना घरात प्रवेश मिळावा यासाठी घराचे दरवाजे उघडे ठेवले जातात. देवी-देवता अंधाऱ्या घरात येत नाहीत, अशीही मान्यता असल्याने रोषणाई आणि दरवाजे उघडे ठेवून त्यांचे स्वागत केले जाते.

पौराणिक कथा काय सांगते?
एका कथेनुसार, एकदा माता लक्ष्मी अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या रात्री पृथ्वीवर भ्रमंतीसाठी निघाल्या. पण संपूर्ण जगात अंधार पसरलेला होता. या अंधारामुळे माता लक्ष्मी रस्ता चुकल्या. तेव्हा त्यांनी ही रात्र मृत्यूलोकात घालवावी आणि सकाळी वैकुंठ धामात परतावे, असे ठरवले. मात्र, त्यांना प्रत्येक घरातील दरवाजा बंद दिसला.

हेही वाचा - Diwali Celebration: केवळ भारतातच नाही तर 'या' देशांमध्येही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात

फक्त एका ठिकाणी एक द्वार उघडे होते आणि तिथे दिवा जळत होता. माता लक्ष्मी त्या दिव्याच्या रोषणाईकडे आकर्षित होऊन तिथे गेल्या. तिथे जाऊन त्यांनी पाहिले की, एक वृद्ध महिला काही काम करत आहे. माता लक्ष्मींनी त्या वृद्ध महिलेला रात्री राहण्यासाठी जागा हवी असल्याचे सांगितले. त्या महिलेने त्यांना घरात आश्रय दिला आणि झोपण्यासाठी बिछाना दिला.

त्यानंतर ती महिला पुन्हा आपल्या कामात मग्न झाली आणि काम करत असतानाच तिला झोप लागली. सकाळी उठल्यावर तिने पाहिले, तर तिच्या घरी आलेली अतिथी निघून गेली होती. पण, तिच्या संपूर्ण घराचे महालात रूपांतर झाले होते. चारही बाजूंनी हिरे-जवाहिर आणि धन-संपत्ती ठेवलेली होती. तेव्हा त्या वृद्ध महिलेला जाणवले की, रात्री तिच्या घरी आलेली अतिथी दुसरी कोणी नसून स्वतः माता लक्ष्मी होत्या.

या घटनेनंतरच अश्विन अमावस्येच्या रात्री घर प्रकाशित करण्याची आणि दरवाजा उघडा ठेवण्याची परंपरा सुरू झाली. या रात्री लोक घराचे दरवाजे उघडे ठेवून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहतात.

हेही वाचा - Narak Chaturdashi 2025 : छोट्या दिवाळीला 'अभ्यंग स्नाना'चे विशेष महत्त्व; जाणून घ्या त्याची अचूक पद्धत आणि शुभ मुहूर्त


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या