Monday, November 10, 2025 09:59:25 AM

Kojagiri Pornima 2025 : कोजागिरी पौर्णिमेला चंद्र प्रकाशात ठेवलेले मसाला दूध का पितात?; धार्मिक आणि शास्त्रीय कारण वाचा

नवरात्री आणि दसरा संपल्यानंतर काहीच दिवसांत कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. पण यादिवशी मसाला दूध का प्यायलं जातं, याचं कारण तुम्हाला माहितीये का?

kojagiri pornima 2025  कोजागिरी पौर्णिमेला चंद्र प्रकाशात ठेवलेले मसाला दूध का पितात धार्मिक आणि शास्त्रीय कारण वाचा

Kojagiri Purnima: हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. नवरात्री आणि दसरा संपल्यानंतर काहीच दिवसांत कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी शब्द ऐकताच पहिले डोक्यात विचार येतो तो म्हणजे मसाला दूध. हे मसाला दूध प्यायला बहुतेकांना आवडते. मात्र, पौर्णिमेला मसाला दूध का पितात यामागे पौराणिक आणि वैज्ञानिक कारण आहे.

पौराणिक कथेनुसार, या दिवशी समुद्र मंथनातून पृथ्वीवर देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. तसंच, आणखी एका मान्यतेनुसार, पौर्णिमेला देवी प्रत्येकाच्या घरी जाऊन कोण जागे आहे हे पाहते आणि जो जागत असेल त्याला देवीचा आशीर्वाद देते. माता लक्ष्मीला दुधाचा नैवैद्य अर्पण केला जातो. तर, काही ठिकाणी खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत.

महाराष्ट्रात सुगंधी दूध किंवा मसाला दूध अर्पण करण्याची परंपरा आहे. हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. त्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दूध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते.   
शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा, यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमादेखील म्हणतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्रकिरणांमध्ये अनेक गुणधर्म असतात त्यामुळं शरीराला फायदा होतो. कारण, या पौर्णिमेचा चंद्र हा 16 कलांचा चंद्र असतो, अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्याचे वैज्ञानिक कारणही आहे.

हेही वाचा - Kojagiri Puja Muhurt : धन-धान्य प्राप्तीसाठी आज रात्री करा माता लक्ष्मीची पूजा, जाणून घ्या पूजेची अचूक वेळ आणि विधी

16 कलांचा चंद्र म्हणजे काय?
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अमृत, मनदा, पुष्प, पुष्टि, तुष्टि, ध्रुति, शाशनी, चंद्रिका, कांति, ज्योत्सना, श्री, प्रीती, अंगदा, पूर्ण आणि पूर्णामृत या 16 कलांनी युक्त असल्याची मान्यता आहे.

चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे चंद्राप्रमाणेच माणसाच्या मनाच्याही 16 कला किंवा अवस्था मानल्या जातात. त्या सुप्तावस्थेत असतात. चंद्राप्रमाणेच माणसाच्या मनातही एक प्रकाश असतो. माणसाने देह सोडल्यानंतर मोक्षाच्या स्थितीमध्ये त्याचे मन, प्राण, प्रज्ञा पूर्ण प्रकाशमय होतात. असे तेव्हाच घडते, जेव्हा या 16 कला माणसाच्या मनात बोधपूर्ण ज्ञानाचे रूप धारण करतात. या 16 कलांची नावे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळी आहेत.

या 16 कलांनी युक्त चंद्राच्या चांदण्यात ठेवलेले दूध किंवा खीर अमृतासमान बनल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध (Masala Dudh) ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. 

शास्त्रीय कारण
कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात बदल होतं असतात. अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद म्हणजे कॅल्शिअम आपल्याचा दुधातून मिळते. यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार, कोजागिरी पौर्णिमेला दुध किंवा दूग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदाक असतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध, खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात.

हेही वाचा - Kojagiri Pornima 2025 : आज भद्रा आणि पंचकाचा अशुभ योग; जाणून घ्या चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवण्याचा शुभ मुहूर्त

आयुर्वेदानुसार, चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दुध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा, यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही किंवा कोणता ही दावा करत नाही.) 


सम्बन्धित सामग्री