Sunday, December 01, 2024 10:22:21 PM

Donald Trump
ट्रम्प २० जानेवारी रोजी होणार अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला.

ट्रम्प २० जानेवारी रोजी होणार अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल व्होट्स मिळवणे आवश्यक असते. ट्रम्प यांनी २९५ इलेक्टोरल व्होट्स मिळवत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. डोनाल्ड यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल व्होट्स मिळवता आल्या. 

अमेरिकेच्या व्यवस्थेनुसार २० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. याआधी डोनाल्ड ट्रम्प २०१७ ते २०२१ या कालावधीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांनी विजय मिळवत अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. बायडेन प्रशासनात उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यंदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. बायडेन यांनी तब्येत साथ देत नसल्याचे कारण देत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

ट्रम्प यांची कारकिर्द

  1. डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला
  2. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून १९६८ मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली
  3. ट्रम्प यांनी २०१७ ते २०२१ पर्यंत अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून काम केले 
  4. ट्रम्प यांनी २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता
  5. ट्रम्प यांनी २०२० च्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून ७ दशलक्ष मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo