Wednesday, December 11, 2024 10:49:03 AM

Double blow to Congress
काँग्रेसला दुहेरी धक्का

काँग्रेसला दुहेरी धक्का बसल्याची चित्र पाहायला मिळत आहे.

काँग्रेसला दुहेरी धक्का

मुंबई : कोल्हापुर जिलह्यातील काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
नुकतच महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आणि दीर्घ काळ पालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे रवी राजा यांनी देखील काँग्रेस सोडली. त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांची मुंबई भाजपा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. 
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा आणि आमदार जयश्री जाधव यांच्या जाण्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या दोघांच्या जाण्याने काँग्रेसला दुहेरी धक्का बसल्याची चित्र पाहायला मिळत आहे.  


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo