सांगली : सांगलीत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आल्याचे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर मिटकरींना हिंदू धर्मातून हाकलण्याची वेळ आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. आमदार अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
नितेश राणेसारख्यांनी आपल्याला हिंदूत्व शिकवू नये असा टोला मिटकरींनी त्यांना लगावला आहे. मालवणच्या पुतळा प्रकरणावर चकार शब्द न बोलणारे नितेश राणे यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच असे वक्तव्य करीत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राणेंनी हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराणं आहे याचं उत्तर दिलंय तर त्यांना आपण खरं हिंदू समजू असं मिटकरी म्हटले. महाराष्ट्रातील जनता नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला उत्सुक असल्याचा टोला यावेळी मिटकरींनी नितेश राणेंना लगावला आहे.