Tuesday, December 10, 2024 11:49:39 AM

Rashmi Shukla
शुक्लांची बदली, फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार

निवडणूक आयोगाचा आदेश आला आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली.

शुक्लांची बदली फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार

मुंबई : निवडणूक आयोगाचा आदेश आला आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.रश्मी शुक्ला यांची बदली झाली असली तरी त्यांच्याकडे नवी कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. 

दिल्लीतून निवडणूक आयोगाने महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले. यानंतर पुढील कारवाई तातडीने झाली. याआधी मविआने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी केली होती.काही दिवसांनंतर शुक्ला यांच्या बदलीसाठी मविआचे नेते दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले. यानंतर रश्मी शुक्ला यांची बदलीबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. 

रश्मी शुक्ला यांच्या बदलीच्या आदेशाचे मविआकडून स्वागत करण्यात आले. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे विरोधकांचे समाधान झाले असेल, अशी प्रतिक्रिया महायुतीकडून देण्यात आली.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo