Friday, December 05, 2025 02:45:39 AM

Money Laundering Case : ED ची मोठी कारवाई; मनी लाँड्रिंगप्रकरणी JP इन्फ्राटेकचे एमडी अटकेत

जेपी इन्फ्राटेक लिमिटेड आणि जेपी असोसिएट्स लिमिटेड (JAL) यांनी रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी घरखरेदीदारांकडून जमा केलेला पैसा इतर प्रकल्पांकडे वळवला. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले.

money laundering case  ed ची मोठी कारवाई मनी लाँड्रिंगप्रकरणी jp इन्फ्राटेकचे एमडी अटकेत

Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी मोठी कारवाई करत जेपी इन्फ्राटेक लिमिटेड (Jaypee Infratech Ltd) चे व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर यांना अटक केली आहे. घरखरेदीदारांच्या निधीचा गैरवापर आणि 12,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या चौकशीत असे समोर आले आहे की, जेपी इन्फ्राटेक लिमिटेड आणि जेपी असोसिएट्स लिमिटेड (JAL) यांनी रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी घरखरेदीदारांकडून जमा केलेला पैसा इतर प्रकल्पांकडे वळवला. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून अनेकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

हेही वाचा - G7 Meeting : G7 चर्चेत भारताचा दबदबा; ऊर्जा पुरवठा, खनिजं, इंडो-पॅसिफिक सागरी सहकार्यासंदर्भात परराष्ट्रमंत्र्यांचा महत्त्वाचा संदेश

खरेदीदारांच्या पैशांचा गैरवापर

दरम्यान, 2017 मध्ये घरखरेदीदारांनी बिल्डरविरुद्ध आंदोलन केले होते आणि अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. ईडीने या तक्रारींच्या आधारे तपास सुरू करून मनोज गौर यांना मुख्य आरोपी म्हणून चौकशी केली. तपासात त्यांच्यावर निधी चुकीच्या पद्धतीने वळवण्याचे पुरावे मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ईडीने मे 2025 मध्ये दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांतील सुमारे 15 ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत एजन्सीने 1.70 कोटी रुपयांची रोकड, डिजिटल उपकरणे आणि बँक कागदपत्रे जप्त केली होती. तपास यानंतर अधिक गतीने सुरू करण्यात आला.

हेही वाचा - Export Promotion Mission: केंद्र सरकारची 25,060 कोटींच्या निर्यात प्रोत्साहन मोहिमेला मंजुरी; सहा वर्षांच्या निर्यात योजनेने MSME क्षेत्राला मोठा दिलासा

ईडी आता या प्रकरणात निधीचा प्रवाह, इतर संबंधित कंपन्यांची भूमिका आणि आर्थिक गैरव्यवहाराचे प्रमाण याबाबत सखोल तपास करत आहे. लवकरच मालमत्ता जप्ती आणि आणखी काही मुख्य लोकांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी संकेत दिले आहेत.


सम्बन्धित सामग्री