Scholarship For OBC Students : प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2025 साठी अर्ज सुरू झाले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना 75,000 ते 1.25 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती 2025 : प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2025 (पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2025) साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत, ओबीसी (इतर मागासवर्गीय) समुदायातील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक मदत दिली जाते. ही योजना देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांची शाळा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत सातत्याने 100 टक्के निकाल देते, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे.
हेही वाचा - भारत बनवतोय अमेरिकेपेक्षाही धोकादायक बंकर-बस्टर बॉम्ब; काय आहे खासियत? जाणून घ्या
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, पात्र विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर नोंदणी करावी, जेणेकरून ते या महत्त्वाच्या आर्थिक मदतीचा लाभ घेऊ शकतील.
कोण अर्ज करू शकतात?
या योजनेअंतर्गत, फक्त ओबीसी (इतर मागासवर्गीय) समुदायाचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. ही शिष्यवृत्ती योजना केवळ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे सध्या इयत्ता 9 वी किंवा इयत्ता 11 वी मध्ये शिकत आहेत. आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे, विद्यार्थ्यांनी अशा शाळेत शिक्षण घेतले पाहिजे ज्या शाळेत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांमध्ये सातत्याने 100 टक्के निकाल लागले आहेत. या सर्व निकषांची पूर्तता करणारे विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
किती शिष्यवृत्ती मिळेल?
प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत (पीएम यशस्वी योजना) इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 75,000 रुपये आणि 11 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 1,25,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. पारदर्शकता आणि जलद वितरण सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे विद्यार्थ्याच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट पाठवली जाईल.
हेही वाचा - Indian Railways: रेल्वेच्या चार्टिंग सिस्टिममध्ये मोठा बदल; ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तयार होणार आरक्षण चार्ट
अर्ज कसा करावा?
- विद्यार्थ्याने NSP पोर्टलवर (scholarships.gov.in) नोंदणी करावी लागेल.
- यासाठी, "NSP OTR" अॅप (गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध) डाउनलोड करावे लागेल.
- अॅपद्वारे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन करून वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) नंबर जनरेट करणे अनिवार्य आहे.
आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल नंबर आवश्यक असेल. जर विद्यार्थी अल्पवयीन असेल आणि त्याच्याकडे आधार नसेल तर पालकांचा आधार क्रमांक वापरता येईल.