Monday, November 04, 2024 10:42:59 AM

Maharashtra Election
बंडोबांना थंड करण्याची मोहीम सुरू

महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना शांत करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

बंडोबांना थंड करण्याची मोहीम सुरू

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना शांत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रमुख नेते बंडखोरांना थेट फोन करून अथवा त्यांना भेटीला बोलावून त्यांची समजूत काढत आहेत. काही ठिकाणी बंडखोरांना शांत करण्यासाठी स्थानिक पातळीवरील एखाद्या प्रभावी व्यक्तीचा मध्यस्तासारखा उपयोग करुन घेण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीत बंडखोरांना शांत करण्याच्या मुद्यावर समन्वय साधण्यासाठी चर्चा होणार आहे. मविआच्या नेत्यांचेही बंड शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

राज्याच्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरिता आतापर्यंत ७९९५ उमेदवारांनी १० हजार ९०५ अर्ज भरले आहेत. शेकडो बंडखोरांनी अर्ज केल्यामुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. नेते बंड शांत करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होईल.

महायुती आणि महाविकास आघाडी लागली कामाला
बंडोबांना थंड करण्याची मोहीम सुरू
मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक
बंडखोरांना शांत करण्याच्या मुद्यावर होणार चर्चा
मविआच्या नेत्यांचेही बंड शांत करण्याचे प्रयत्न सुरू


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo