Supercomputer Car : तंत्रज्ञानाच्या युगात गाड्या आता केवळ प्रवासाचे साधन न राहता 'स्मार्ट गॅझेट' बनल्या आहेत. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी लीपमोटर (Leapmotor) आपली आतापर्यंतची सर्वात प्रगत SUV 'D19' एप्रिल 2026 पर्यंत जागतिक बाजारपेठेत उतरवणार आहे. या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचे 'सुपरकॉम्प्युटर'सारखे काम करणारे इंजिन आणि हाय-टेक सुरक्षा फीचर्स. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लक्झरी यांचा सुरेख संगम असलेल्या या कारने ऑटोमोबाईल क्षेत्रात आतापासूनच मोठी खळबळ उडवून दिली आहे.
जगातील पहिला 'ड्युअल चिप' स्मार्ट सेंट्रल कॉम्प्युटर
लीपमोटर D19 ही जगातील पहिली अशी कार आहे, ज्यामध्ये Qualcomm चे दोन 8797 (Snapdragon Elite) चिप्स वापरण्यात आले आहेत. हा ड्युअल चिप सेट एका सुपरकॉम्प्युटरप्रमाणे काम करतो, जो कारचे ड्रायव्हिंग, सेफ्टी आणि एंटरटेनमेंट सिस्टीम अतिशय वेगाने आणि अचूकपणे हाताळतो. यासोबतच यामध्ये कंपनीची नवीन VLA (Vision-Language-Action) ड्रायव्हिंग सिस्टीम देण्यात आली आहे, जी भविष्यातील स्वयंचलित गाड्यांसाठी एक मैलाचा दगड ठरेल.
दोन दमदार प्रकार: EV आणि EREV (हायब्रिड)
कंपनी ही SUV दोन वेगळ्या पॉवर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देणार आहे:
EV (पूर्णपणे इलेक्ट्रिक): हा मॉडेल तब्बल 724 hp (हॉर्सपावर) जनरेट करतो. यात 115 kWh ची मोठी बॅटरी असून, एकदा फुल चार्ज केल्यावर ती 720 किमी (447 मैल) पर्यंत धावू शकते.
EREV (हायब्रिड): ज्यांना रेंजची चिंता आहे त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. यात बॅटरीसोबत एक छोटा इंजिन बॅटरी चार्ज करण्यासाठी दिला आहे. हे मॉडेल 536 hp पॉवर आणि फक्त बॅटरीवर 500 किमी (311 मैल) रेंज देते.
हेही वाचा - Most Downloaded App : अॅपचं नाव वाचूनच थरकाप उडतो! डाउनलोड केल्यावर दर 48 तासांनी…; एवढं भयानक नाव असलेलं अॅप लोक का डाउनलोड करतायत?
वेग आणि सुविधांचा जबरदस्त मेळ
गतीचा विचार केल्यास ही कार अवघ्या 3 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 किमी प्रति तास इतका वेग गाठू शकते. यात 800-Volt आणि 1000-Volt ची सुपरफास्ट चार्जिंग सुविधा दिली आहे, ज्यामुळे काही मिनिटांतच बॅटरी लक्षणीयरीत्या चार्ज होते. प्रवाशांच्या आरामासाठी यात 'एअर सस्पेंशन' तंत्रज्ञान दिले आहे, जे रस्त्यावरील खड्ड्यांनुसार स्वतःला ॲडजस्ट करते, ज्यामुळे प्रवासात धक्के जाणवत नाहीत.
सुरक्षेसाठी 'कम्पास टर्न' आणि खास तंत्रज्ञान
सुरक्षेच्या बाबतीत ही कार अतिशय चोख आहे. जर गाडी चालवताना टायर फुटला, तरी गाडीचे संतुलन बिघडणार नाही अशा खास तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. तसेच, अरुंद रस्ते किंवा गल्लीबोळात गाडी वळवण्यासाठी यात 'Compass Turn' नावाचा भन्नाट फिचर आहे. याच्या मदतीने ही महाकाय SUV अतिशय कमी जागेत सहजपणे वळवता येते. याव्यतिरिक्त, कारमध्ये प्रवाशांसाठी चक्क 'ऑक्सिजन जनरेटर' देखील देण्यात आला आहे, जो प्रवासात ताजी हवा सुनिश्चित करतो.
हेही वाचा - Grok AI Restrictions: आता डिजिटल गुन्ह्यांना लागणार लगाम, भारत सरकारच्या इशाऱ्यानंतर 'ग्रोक AI'वर घालण्यात आले 'हे' कडक निर्बंध