न्यूयॉर्क : उद्योगपती इलॉन मस्कने एक्स पोस्ट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. एक्स या समाजमाध्यमावर लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये मोदी आघाडीवर आहेत, असेही मस्क म्हणाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर दहा कोटींपेक्षा जास्त फॉलोअर झाले आहेत. मोदींच्या फॉलोअरनी नवा उच्चांक गाठल्यानंतर मस्कने मोदींचे कौतुक करणारी एक्स पोस्ट केली.