अलिकडच्या काळात, अज्ञात लोक चित्रपट कलाकार, राजकारणी, शाळा आणि सरकारी संस्थांना बॉम्बस्फोटाची धमकी देणे सामान्य झाले आहे. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी अभिनेते रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या डीजीपी कार्यालयाला रजनीकांतच्या घरात बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारा ईमेल मिळाला.ही माहिती मिळताच पोलिसांनी सावधगिरी बाळगून कारवाई केली. पथकाने घराची आणि आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी केली. तपासादरम्यान कोणतेही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.
हेही वाचा - Marathi Films: मराठी चित्रपटांचे तिकीट दर आता 100 ते 150 रुपये होणार? मंत्रालयातील बैठकीनंतर सरकार लवकरच घेणार महत्त्वाचे निर्णय
त्यानंतर अधिकाऱ्यांनी तो ईमेल खोटा असल्याचे घोषित केले. पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, परंतु आता ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणात सहभाग घेतला आहे आणि ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा - The Family Man Season 3 : प्रतिक्षा संपली ! मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन सीझन 3' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टिझर समोर
रजनीकांतचा पोएस गार्डन बंगला चेन्नईतील सर्वात सुरक्षित आणि प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक मानला जातो. तो अनेकदा पोलिसांच्या देखरेखीखाली असतो, परंतु या घटनेनंतर सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.