Wednesday, December 11, 2024 11:14:30 AM

28 teams for compliance for code of conduct
आचारसंहिता पालनासाठी २८ पथके स्थापन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्यात आली आहे.

आचारसंहिता पालनासाठी २८ पथके स्थापन

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्यात आला असून, पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आचारसंहितेची २८ पथके स्थापन करण्यात आली आहेत.

निवडणूक काळात नागरिकांनी व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी कोणतेही साहित्य, रकमा सोबत ठेवताना त्यासंदर्भाचे योग्य दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात असून, त्याचा अहवाल दररोज निवडणूक विभागाला सादर केला जात असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo