Sunday, January 26, 2025 07:33:40 PM

EVM Hacking Claim False
ईव्हीएम हॅक केल्याचा दावा खोटा, निवडणूक आयोगाने फेटाळले आरोप

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओत दावा करण्यात आला होता की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हॅक केली गेली होती.

ईव्हीएम हॅक केल्याचा दावा खोटा निवडणूक आयोगाने फेटाळले आरोप

मुंबई : सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओत दावा करण्यात आला होता की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हॅक केली गेली होती. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ईव्हीएम मशीनच्या फ्रिक्वेन्सीमध्ये फेरफार करत असल्याचा दावा करत होता. मात्र, निवडणूक आयोगाने या दाव्याच खंडन केला आहे.

निवडणूक आयोगाने रविवारी ट्विटरवर एक निवेदन जारी करत म्हटले की, "ईव्हीएम मशीनमध्ये हॅकिंग किंवा छेडछाड करणे पूर्णपणे अशक्य आहे. या मशीनमध्ये वाय-फाय किंवा ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट होण्याची क्षमता नाही, त्यामुळे यामध्ये कोणतीही फेरफार केली जाऊ शकत नाही."

निवडणूक आयोगाने या प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे गुन्हा नोंदवला असून, सायबर सेलकडून याबाबत पुढील तपास सुरू आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, या प्रकारच्या खोट्या दाव्यांमुळे लोकांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो आणि त्यावर कठोर कारवाई केली जाईल.


सम्बन्धित सामग्री