Sunday, March 08, 2026 11:54:59 PM

T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषकात रंगत वाढली; 3 संघ बाद, उरलेल्या 5 संघांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला विजयी मिळवत दिमाखात सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता पाकिस्तानसह पाच संघांवर टांगती तलवार आहे.

t20 world cup 2026  टी20 विश्वचषकात रंगत वाढली 3 संघ बाद उरलेल्या 5 संघांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला विजयी मिळवत दिमाखात सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. साखळी फेरीतील अजून एक सामना शिल्लक असला तरी, भारताचे पुढील फेरीतील स्थान आणि संभाव्य वेळापत्रक आता समोर आले आहे. 2026 चा टी20 विश्वचषक आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे. नेपाळ, ओमान आणि नामिबिया हे संघ आधीच लीग टप्प्याच्या मध्यभागी बाहेर पडले आहेत. यानंतर, आता पाकिस्तानसह नेदरलँड्स, आयर्लंड आणि स्कॉटलंड, अफगाणिस्तान हे पाच संघ आहेत ज्यांचे सुपर 8 मध्ये स्थान त्यांच्या आगामी सामन्यांच्या निकालांवर पूर्णपणे अवलंबून आहे.

हेही वाचा- T20 World Cup 2026: टीम इंडियाचे सुपर 8 वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणामध्ये होणार लढत
काल 15 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा आव्हानात्मक प्रवास या पराभवाने डळमळीत झाला. एकीकडे पॉइंट टेबलवर ढासाळत असताना भारताविरुद्धच्या परभवानंतर पाकिस्तान नेट रन रेटवरही खाली घसरला. ग्रुप अ मध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचा पुढचा सामना करा किंवा मरा अशी परिस्थिती घेऊन आला आहे. हा सामना हरल्यास पाकिस्तानला विश्वचषकापासून हात लांब करावे लागण्याची वेळ येऊ शकते. 
तसेच नेदरलँड्ससमोर कठीण आव्हान आहे. ग्रुप अ मधील नेदरलँड्स संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा पुढचा सामना भारताविरुद्ध आहे. जर त्यांनी हा सामना गमावला तर ते सुपर 8 च्या शर्यतीतून निश्चितच बाहेर पडतील.

हेही वाचा- India Vs Pakistan Match: कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला नमवून भारताचा सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश, 6 पॉईंट्सने पोहोचला पहिल्या स्थानावर
त्याचसोबत ग्रुप बी मध्ये असलेला आयर्लंड आणि ग्रुप सी मध्ये असलेला स्कॉटलंड संघ तीन सामन्यांपैकी फक्त एका विजयामुळे पॉइंट टेबलमध्ये मागे पडला आहे. आता त्यांना त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
दुसरीकडे अफगाणिस्तानसाठी या विश्वचषकातील सामने अपयशांनी भरलेली स्पर्धा ठरली आहे. जर संघाने लवकरच पुनरागमन केले नाही तर त्यांचा प्रवास लीग टप्प्यातच संपुष्टात येऊ शकतो.


सम्बन्धित सामग्री