नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. या कालावधीत अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे.