महाराष्ट्र : काही दिवसांपूर्वी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता रोजगाराबाबत मोठी घोषणा केली आहे. हि घोषणा तरुणांसाठी मोठ्या फायद्याची आहे. भारत आहे तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो परंतु त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तरुणानांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्याचं बोललं जात. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १.५ लाख सरकारी नोकरीची घोषणा केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
'आधीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची बढती प्रक्रिया पूर्ण करा. नंतर नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरूवात करा. तसेच नवीन भरती आणि विद्यमान कर्मचार्यांना डोमेन ज्ञान आणि तंत्रज्ञान अवलंबन यावर लक्ष केंद्रीत करणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर ' सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक वेळ फ्लिडमध्ये घालवावं लागेल. जिल्ह्यांमध्ये सचिवांच्या भेटींसाठी तपशीलवार वेळापत्रक तयार करा. सरकारी कार्यक्रम आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणा मजबूत करा.'
त्याचबरोबर राज्यात विविध योजना राबवण्यासह तरूणांना सरकारी नोकरी मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यातील तरूणांसाठी लवकरच १.५ लाख रोजगार उपलब्ध करण्यात येतील, त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिल्याचं समोर आलं आहे. या घोषणेमुळे तरुणांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यांनी मोठी घोषणा केल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे.